Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विविध विकासकामे सातत्याने सुरू आहेत. मागील दीड वर्षाच्या काळात आपले सरकार आले, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तालुक्यात आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वातखाली किमान शंभर कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.
आजदेखील घोटण गावात दहा कोटी रुपयांचा निधी घेऊन, आलो. पहिली दिवाळी विधिवत साजरा झाली आता दुसरी दिवाळी दि. २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने साजरी करा, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तालुक्यात विविध ठिकाणी २१ कोटी १४ लाख रुपये खर्चाच्या रस्त्यांच्या कामाचा भुमिपूजन समारंभ खा. विखे यांच्या हस्ते करण्यात आला, या वेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी लक्ष्मणराव टाकळकर होते. या वेळी आमदार मोनिका राजळे, भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंढे, भाजपचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, गंगामाई कारखान्याचे उपाध्यक्ष व्ही. एस खेडेकर, तहसलीलदार प्रशांत सांगडे, गटविकास अधिकारी राजेश कदम,
भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमोल सागडे, माजी नगरसेवक सागर फडके, बाळासाहेब कोळगे, रामा कोळगे, चंद्रकांत गरड, संजय टाकळकर, घोटण सरपंच ताराबाई घुगे, उपसरपंच पिरमंहमद शेख, गणेश कराड, तुषार पुरनाळे, कैलास सोनवणे, फुलचंद रोकडे, बी. जे. मुरदारे आदी प्रमुख उपस्थित होते.
खा. विखे पुढे म्हणाले की,पहिली दिवाळी विधिवत साजरा झाली आता दुसरी दिवाळी ही २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये अयोध्या येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने साजरी होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रत्येक गावातील कुटुंबांना साखर व डाळ वाटप करण्यात येत आहे. साखर व डाळीपासून प्रत्येक कुटुंबाने या दिवशी लाडू करुन हा सोहळा साजरा करावा.
या वेळी आ. राजळे म्हणाल्या,चार राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपला तीन राज्यात घवघवीत यश मिळाले. त्यामुळे कार्यकर्ते व व नागरीकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेली दहा वर्षे सामान्य जनता,
तरुण व महिलांसाठी आरोग्य, शैक्षणिक, वैयक्तिक लाभ व विविध विकासकामे केल्याने हे यश आपल्याला मिळत आहे. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा व साखर वाटपाचा शुभारंभ विखे व राजळे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक संजय टाकळकर यांनी केले. उपसरपंच पिरमंहमद शेख यांनी आभार मानले.