अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- मोदी सरकारने पारित केलेले शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावे लागले, हा दिल्ली सीमेवर व देशभरातून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा ऐतिहासिक विजय आहे.
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला मोठे यश प्राप्त होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शेतकरी आंदोलनाच्या सर्व मागण्या मान्य केल्या,
त्यामुळे आज शेवगावमध्ये भारतीय कम्युनिष्ट पक्ष, किसान सभा व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने फटाके वाजवून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
अखिल भारतीय किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व एसटी कामगारांनी शहीद झालेल्या शेतकऱ्यांना अभिवादन करून व फटाके वाजवून आनंदोतस्व साजरा केला.
या वेळी मोठी घोषणाबाजीही करण्यात आली. या वेळी कम्युनिष्ट पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी आंदोलनाबरोबर एसटी कामगारांचा प्रश्न मार्गी लावावा, असेही या वेळी पदाधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम