Shrigonda News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेनी सुरू केलेल्या लढ्याला समर्थन देण्यासाठी श्रीगोंदा सकल मराठा समाजाच्या मागील २२ दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती भारती इंगावले यांनी दिली.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या लढ्याला समर्थन देण्यासाठी देण्यासाठी दि.४ डिसेंबर रोजी श्रीगोंदा सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू केलेले साखळी उपोषण मनोज जरांगे यांच्या सूचनेप्रमाणे आज दि.२५ डिसेंबर रोजी स्थगित करण्यात आले.
या २२ दिवसांमध्ये तालुक्यातील रोज एक ते दोन गावांतील नागरिक पाठिंबा देण्यासाठी श्रीगोंदा तहसील येथे येत होते. साखळी उपोषणामध्ये आत्तापर्यंत महांडूळवाडी, सांगवी दुमाला, चिभळा, निमगाव खलू, घारगाव, आढळगाव,
अजनूज, सुरोडी, मुंगुसगाव, देवदैठण, वांगदरी, पिसोरेखांड, कोळगाव, पेडगाव, पिंप्री कोलंदर, घुगलवडगाव, गार, आनंदवाडी, चिखली, कोरेगाव, सुरेगाव, घुटेवाडी, तांदळी, टाकळी, बांगर्डे, कोसेगव्हाण, चोराचीवाडी, आद गावांमधील हजारो मराठा बांधवांनी सहभाग नोंदवला.
या वेळी बाळासाहेब धोत्रे, सुदाम कुटे, सुनिल गायकवाड, भारती इंगावले, राजेंद्र नागवडे, माया खंडके, प्रेम मोहिते, वंदना भापकर, आदींनी आपले मत मांडले.
या आंदोलनाच्या स्थगितीसाठी प्रसाद काटे, आनंद लगड, मारुती सुंबे, आनंद औटी, लक्ष्मण वनपुरे, आरती रणसिंग, सोनाली शिंदे, प्रशांत जाधव, देवा घोगरे, दादासाहेब गव्हाणे, गौतम दांगडे, भारत पवार आदी उपस्थित होते.