कोपरगाव नगरपालिके समोर १६ कोटींची थकबाकी वसुलीचे आव्हान

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- गेल्या अनेक वर्षांपासून पालीकेची घरपट्टी व पाणीपट्टी न भरणाऱ्या थकबाकीदारांमुळे तब्बल १६ कोटी रुपयांची थकबाकी वसुल करण्याचे आव्हान कोपरगाव नगरपालिकेच्या समोर आहे.

करोनाचे कारण पुढे करीत काही नागरीकांनी व व्यापाऱ्यांनी जाणुनबुजून थकबाकी भरत नसल्याने अखेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी आता मैदानात उतरले आहे.

गोसावी यांनी कायद्याचा बडगा उगारला असुन जाणुनबुजून थकबाकी न भरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करुन संबधीताचे दुकाने सिल करणार असल्याची माहिती दिली आहे.

नागरीकांना योग्य नागरी सुविधा देण्यासाठी उत्पन्न आणि खर्च याचा समतोल साधण्यासाठी वसुली होणे गरजेचे आहे. वसुलीसाठी काहीवेळा कठोर निर्णय घ्यावे लागणार आहे.

हे सर्व जनहितासाठी करीत आहोत. असे गोसावी म्हणाले. तसेच सध्या ८ कोटी २८ लाख रूपये घरपट्टी थकीत आहे तर ६ कोटी ३२ लाखाची पाणी पट्टी आणि व्यवसायीक व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांची थकीत बाकी १ कोटी ४० लाख रुपये वसुल होणे बाकी आहे.

एकुण वसुली पैकी घरपट्टी ३३ टक्के व पाणीपट्टी केवळ २५ टक्के वसुल झाल्यामुळे पालीका आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे.

येत्या दोन दिवसांत वसुलीची कारवाई जोरात सुरु करण्यात येईल जे व्यापारी व थकबाकीदार आपली थकबाकी त्वरीत भरत नसतील त्यांचे दुकाने सिल करण्यात येतील.

सिल करुनही थकबाकी भरली नाही तर संबधीत दुकाने पालीका प्रशासन ताब्यात घेवून त्यांचा फेरलिलाव करुन थकबाकी वसुल करणार आहे.

नागरीकांनी पालीकेला कटु निर्णय घेण्यास भाग पाडु नये. पालीका प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे असे आव्हान गोसावी यांनी नागरीकांना केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe