अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- अतिक्रमित जागेवरील टपरीच्या वादातून दाखल झालेल्या अॅट्रासिटीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष िकसन चव्हाण यांचे नेतृत्वाखाली कुकाण्यात रास्ता रोको केले.
सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नेवासे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. पोलिसांनी हरीष चक्रनारायण रा नेवासे

,िकसन जगन्नाथ चव्हाण रा. शेवगाव, सुरेश गोपीनाथ आढागळे रा. सौंदाळा, कैलास बबन पवार रा. वडुलेे, विजय गायकवाड रा. राहुरी, मुकेश मानकर रा. गदेवाडी, भोरू उर्फ रविंद्र म्हस्के रा. कोरडगाव आदी ३० ते ४० जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम












