कुकडीचे आवर्तन ५ सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवावे : आ.रोहित पवार

Published on -

Ahmednagar News : कर्जत तालुक्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन येत्या ५ सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवावे, तसेच घोड डाव्या आणि उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू करावे.

अशी विनंती कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटून केली आहे. येत्या २ तारखेला कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे परंतु एवढा उशिर न करता त्याआधीच बैठक घेऊन त्यामध्ये मंत्री महोदयांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा, अशीही विनंती आ. पवार यांनी केली आहे.

कर्जतमधील एकूण ५४ गावे शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी कूकडी डाव्या कालव्यावर अवलंबून आहेत. मागील हंगामातील आवर्तन संपून दोन महीने झाले आहेत, आणि पावसाळा सुरू होऊन देखील म्हणावा तसा चांगला पाऊस झालेला नाही.

त्यामुळे पाण्याची पातळी खालावली असून खरीप पिकांचे नुकसान होणार आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याची देखील मोठी टंचाई आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी याचं अनुषंगाने आ. पवार यांनी शेतकरी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कुकडीच्या पाणी नियोजनाची बैठक घेतली होती.

ज्यामध्ये ३० तारखेऐवजी ५ सप्टेंबरपर्यंत आवर्तन सुरू ठेवण्याबाबत विनंती केली होती. आता आ. पवार यांनी याच विषयी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना भेटून याबाबत शेतकऱ्यांची बाजू मांडली.

पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने, शेतीसाठी व पिण्यासाठी पाण्याची अडचण लक्षात घेऊन कुकडीचे आवर्तन ५ तारखेपर्यंत सुरू ठेवावे. अशी विनंती मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी भेटून केली.\

चंद्रकांतदादांनीही नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी याबाबत चर्चा केली. यासोबतच पाण्याचा दाब हा ५०० च्या खाली ठेऊन चालणार नाही तो ५०० च्या वरती असावा, जेणेकरून जास्त दाबाने पाणी मिळेल असे देखील यावेळी मी मंत्री महोदयांना सांगितले. – आ. रोहित पवार

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News