‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’; ग्रामसेककासह अंगणवाडीसेविका देखील भरणार हा फॉर्म ..

Pragati
Published:

Ahmednagar News : राज्यातील महिलांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे. राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे. महिला आणि त्यांच्यावर अवलंबुन असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे. या उद्देशाने ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ योजना सुरु केली आहे.

मात्र या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे जमा करताना महिलांची चांगलीच धावपळ होत आहे. आधीच कर्मचारी कमी त्यात परत या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे व इतर उतारे देताना या कर्मचाऱ्यांची दमछाक होते.

या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्यावर सोपविली आहे. योजनेतील प्रत्यक्ष लाभार्थी महिलांना पहिला हप्ता १५ ऑगस्टपासून मिळणार आहे. त्यासाठी विभागाकडून नारीशक्ती दूत अँप विकसित केले आहे. या अँप वर अर्ज भरून घेण्याची जबाबदारी अंगणवाडीसेविका, ग्रामसेवकांची असणार आहे.

अधिवेशनामध्ये शासनाने ही योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार पात्र महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. या योजनेची प्रक्रिया, शासन नियम, अटी प्रसिद्ध केल्या आहेत. या योजनेची सोमवारपासून कार्यवाही सुरू झाली. काढण्यात आलेल्या शासन आदेशात काहीसा बदल केला जाणार असल्याने सुधारित आदेश काढला जाईल.

नारीशक्ती दूत अँप गुगलवर आजपासून डाउनलोड केला आहे. या योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल अँप , सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाइन भरता येतील. ज्या महिलांना ऑनलाइन अर्ज भरता येणार नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी, बालविकास प्रकल्प अधिकारी व ग्रामपंचायत येथे सुविधा उपलब्ध असणार आहेत.
परिपूर्ण अर्ज अंगणवाडी केंद्र अथवा बालविकास प्रकल्प अधिकारी अथवा सेतू सुविधा केंद्रामध्ये जमा करायचे आहेत.

तसेच हे अर्ज विनामूल्य उपलब्ध आहेत. प्रत्येक क्षेत्रातील अंगणवाडी, ग्रामपंचायत, पालिका महापालिकेच्या फलकावर अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असून लाभार्थी महिलांना पहिला हप्ता १५ ऑगस्टपासून मिळणार आहे. यासाठी विभागाकडून नारीशक्ती दूत अँप विकसित केले आहे.
प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe