‘या’ ठिकाणी १० वर्षाखालील मुले व ६५ वर्षावरील ज्येष्ठांना प्रवेश नाही!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  शासनाच्या निर्देशानुसार खबरदारीचा उपाय म्हणून गर्दीची ठिकाणे नियंत्रीत करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत शनीशिंगणापूर

येथील श्री शनैश्वर देवस्थान प्रशासनाने सोमवारपासून रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत पुढील आदेशापर्यंत मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचबरोबर १० वर्षाखालील मुले व ६५ वर्षावरील नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिली.

राज्यात पुन्हा एकदा करोना विषाणूंच्या संसर्गाचे वाढते प्रमाण तसेच ओमायक्रॉन विषाणुबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाच्या निर्देशानुसार खबरदारीचा उपाय व सामाजिक जबाबदारी म्हणून १० वर्षाखालील मुले व ६५ वर्ष वयाचे पुढील नागरिकांना तसेच गर्भवती स्त्रियांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश मिळणार नाही.

तसेच इतर सर्व भाविकांनी करोना बाबतचे सर्व नियमांचे पालन करणे सक्तीचे असून देवस्थान प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe