अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- अल्पवयीन मुलाने बंद घराचा दरवाजा उचकटून घरात घुसून घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. परंतू, घरमालकाने इतरांच्या मदतीने त्याला रंगेहात पकडले. पांगरमल (ता. नगर) शिवारात ही घटना घडली.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांगरमल गावातील शेतकरी पंढरीनाथ नाथा आव्हाड (वय 75) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पंढरीनाथ आव्हाड हे कुटुंबीयासह शेतात गेले होते. त्यांच्या घरास कुलूप लावलेले होते. चोरट्याने सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घराच्या मागील दरवाजा उचकटून आत प्रवेश केला.
चोरटा घरातील समानाची उचकापाचक करत होता. पंढरीनाथ आव्हाड यांना माहिती मिळताच त्यांनी शेजारील शेतकर्यांच्या मदतीने घरफोडी करणार्यास रंगेहात पकडले.
चोरटा पकडल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी यांनी पांगरमल येथे जाऊन चोरी करण्याचा प्रयत्न करणार्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.
त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक संदीप आव्हाड पुढील तपास करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम