अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-डॉक्टरांनी सामाजिक भावनेने रुग्णसेवेचा वारसा पुढे चालवावा. आजच्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना अद्यावत आरोग्यसुविधा मिळण्यासाठी विविध शिबीर महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
केअर अॅण्ड क्युअर हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. शेख कुटुंबीयांनी गरजूंसाठी आपली दारे उघडी करुन सर्वसामान्यांना आधार देत रुग्णसेवेचे व्रत जोपासले असल्याची भावना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनिल पोखरणा यांनी व्यक्त केली. शहरातील किंग रोड,
रामचंद्र खुंट येथील केअर अॅण्ड क्युअर हॉस्पिटलच्या वतीने नागरिकांसाठी मोफत स्त्रीरोग व अस्थीरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. पोखरणा बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एमसीआयचे डॉ. निसार शेख, डॉ. आर.आर. धूत,
नगरसेवक नज्जू पैलवान, डॉ. विजय पाटील, हाजी अब्दुल कादीर, हॉस्पिटलचे डॉ.सईद शेख, अस्थिरोग तज्ञ डॉ. जाहीद शेख, स्त्रीरोग प्रसुती तज्ञ डॉ. मारिया शेख, स्त्रीरोग वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. कुदरत शेख आदी उपस्थित होते. नगरसेवक नज्जू पैलवान यांनी डॉ. सईद शेख यांच्या परिवारातील सर्व सदस्य डॉक्टर असून, सामाजिक भावनेने त्यांचे कार्य सुरु आहे.
संपुर्ण कुटुंबीय गरजू रुग्णांची सेवा करीत असल्याचे स्पष्ट केले. डॉ.आर.आर. धूत यांनी सदर जागा शेख यांना देताना या हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा घडावी या भावनेनेच देण्यात आली आहे. जुने धूत हॉस्पिटलच्या जागेत नव्याने सुरु झालेले केअर अॅण्ड क्युअर हॉस्पिटल लवकरच नावरुपास येणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
एमसीआयचे डॉ. निसार शेख यांनी हॉस्पिटलच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत शिबीराचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात अस्थिरोग तज्ञ डॉ. जाहीद शेख यांनी अत्यंत बिकट परिस्थितीवर मात करुन शेख परिवार आरोग्य क्षेत्रात उभे राहिले आहे. सर्वसामान्यांची जाणीव ठेऊन हॉस्पिटलची भविष्याची वाटचाल राहणार असून,
अल्प दरात रुग्णांना दर्जेदार अद्यावत सुविधा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचे स्वागत स्त्रीरोग वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. कुदरत शेख यांनी केले. या शिबीरास नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये गरोदर स्त्रियांची तपासणी, वंध्यत्व निवारण, स्त्री रोग निदान व उपचार, वयात येतानाच्या तक्रारींवर मार्गदर्शन,
विवाहपूर्व समुपदेशन, प्रसूतिपूर्व प्रसुतीपश्चात तपासणी, वेदनारहित प्रसूती, वारंवार गर्भपात होणे निदान व उपचार, कुटुंबनियोजन सल्ला व मार्गदर्शन, पोटावर एकही टाका न घेता गर्भपिशवी काढणे, तसेच अस्थिरोगाशी संबंधीत मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी,
संधिवात, सर्व प्रकारचे जुळून आलेले फ्रॅक्चर, फ्रोजन, सांधे निखळणे आदी संदर्भात तपासण्या करण्यात आल्या. या शिबीरात सहभागी झालेल्या रुग्णांच्या ऑपरेशन सवलतीच्या दरात होणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सईद शेख यांनी केले. आभार डॉ. मारिया शेख यांनी मानले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved