अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- पाथर्डी तालुक्यातील कल्याण – विशाखापट्टणम या महामार्गाचे काम देवराई गावात रखडले आहे. तसेच या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठे खड्यामुळे होणारे अपघात.
यामुळे तालुक्यातील देवराई या गावातील ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदाराचे नगरकडे डांबर घेऊन जाणारे डंपर गावातच अडडवून अगोदर इथले खड्डे बुजवा मग नगरच्या कामाकडे डंपर घेऊन जा अशा स्पष्ट शब्दात सुनावत ठेकेदाराचे डंपर अडवून धरले.
त्यानंतर अवघ्या तासाभरात देवराईतील अर्ध खड्डे डांबर टाकून दुरुस्त करण्यात आले.देवराई गावात रखडलेल्या कामामुळे प्रवाशाना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
गेली चार वर्ष प्रवाशी व ग्रामस्थ हा त्रास सहन करत आहेत. अनेकांनी आपला जीव गमावला आहे. धुळीमुळे रस्त्याच्या कडेच्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
परंतु याकडे महामार्गाचे अधिकारी व ठेकेदाराने सातत्याने दुर्लक्ष केले. शेवटी देवराईचे ग्रामस्थ रस्त्यावर उतरले व त्यांनी नगरकडे डांबर घेऊन जाणारे डंपर अडवून अगोदर इथले खड्डे बुजवा असे म्हणत
गावातील अर्धे खड्डे एका तासात डांबर टाकून दुरुस्त केले. उर्वरित खड्डे देखील दोन दिवसात दुरुस्त न केल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू असा इशारा देवराई ग्रामस्थांनी दिला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम