Ahmednagar News : अमृत महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत देण्यात येणार सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून प्रथम पुरस्कार हा अहमदनगर जिल्ह्यास मिळाला आहे. तर द्वितीय पुरस्कार जिल्हा जळगाव व तृतीय पुरस्कार धुळे जिल्ह्यास जाहीर करण्यात आला आहे.
राज्य पुरस्कृत सर्वोत्कृष्ट तालूका म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील प्रथम पुरस्कार जामखेड तालुका, द्वितीय पुरस्कार शेवगाव तालुका तर तृतीय पुरस्कार नेवासा तालुक्यास जाहीर करण्यात आला आहे.
सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतः प्रथम पुरस्कार अरणगाव ग्रामपंचायत (ता. जामखेड, जि. अहमदनगर), द्वितीय पुरस्कार गोलेगाव ग्रामपंचायत (ता. शेवगाव जि. अहमदनगर) या सर्व पुरस्काराचे वितरण नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात दि.१२ मार्च रोजी नियोजन सभागृहात होणार आहे.
जिल्ह्यात तालुकास्तरीय पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पाथर्डी तालुक्यास प्रथम पुरस्कार जाहीर झाला असून तृतीय पुरस्कार कर्जत तालुक्यास मिळाला आहे.
पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी गावाला पुरस्कार मिळाला आहे. पाथर्डीकरांची मान उंचावणारी ही घटना आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजीराव कांबळे, तत्कालीन गटविकास अधिकारी डॉ. जगदिश पालवे यांनी व समितीचे विस्तार अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थ व सीआरपीताई यांनी सर्वांनी केलेल्या कामाचे हे श्रेय आहे.
मालेवाडी ग्रामपंचायतीचे दिवंगत सरपंच आदिनाथ दराडे, उपसरपंच, सर्व सदस्य, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आण्णासाहेब गहिरे, गावचे ग्रामसेवक अशोक दहिफळे, सीआरपीताई सुलभा जवरे यांच्यासह गावातील लाभार्थ्यांनी घेतलेल्या सामुहीक कष्टातुन ही चांगले कामे उभे राहिली.
मालेवाडी ग्रामपंचायतला नाशिक विभागात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याने व पाथर्डी तालुका व अहमदनगर जिल्हा, अशी सर्वांचीच झालेली चांगल्या कामाची महती अतिशय चांगली आहे. दुष्काळी भाग आणि ऊसतोडणी कामगारांचा हा भाग आहे.
प्रत्येकाला घर मिळावे हे सामान्य माणसांचे स्वप्न असते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून तयार झालेली ही योजना यशस्वीपणे राबविणारे मालेवाडी गाव उत्तम, असे ठरले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामात गावच्या स्थानिक नागरीकांपासुन ते सरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांनी नियोजनाने काम केले. आम्ही पाठपुरावा केला. सरकारी योजनेला लोकांच्या सहभागाची जोड मिळाली की, विकासाची कामे उत्कृष्टपणे होत असतात.
त्याचेच उदाहरण मालेवाडी ग्रामपंचायत आहे. त्यामुळे पाथर्डी तालुका देखील उत्कृष्ट तालुका म्हणून निवडला गेला आहे. अहमदनगरचा प्रथम क्रमांक आला. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम झाले होते. केलेल्या कामाचा गौरव होतोय, यामध्ये आनंद आहे. संघटितपणे केलेल्या कामाचे फळ आहे. – डॉ. जगदिश पालवे, पशुधनविकास अधिकारी पाथर्डी.
अमृत महाआवास अभियान ग्रामीण ३.० विभागस्तरीय पुरस्कार मालेवाडी ग्रांपचायत, पाथर्डी तालुका व अहमदनगर जिल्ह्याला मिळाला आहे. मालेवाडी गावचे सरपंच आदिनाथ दराडे यांनी अतिशय चांगले काम केले. मात्र, सरपंच दराडे यांचे नुकतेच अकाली निधन झाले आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी दराडे नाहीत, हे शल्य ग्रामस्थांच्या मनामध्ये कायम राहील.