अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- केडगाव उपनगरात दोन ठिकाणी सुरू असलेल्या कल्याण मटका जुगार अड्ड्यांवर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कृष्णा दत्तात्रय डहाळे (वय 38 रा. केडगाव) व हरिष बापुराव सावेकर (वय 62 रा. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
केडगाव उपनगरात दोन ठिकाणी कल्याण मटका जुगार सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांना मिळाली होती.
त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या. कृष्णा डहाळे हा केडगाव कांदा मार्केट रोडवरील हॉटेल पंचमीच्या आडोशाला जुगार अड्डा चालवित होता.
पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडून रोख रक्कम, जुगार साहित्य जप्त केले. दुसरा छापा केडगाव उपनगरातील रंगोली हॉटेलच्या पाठीमागे टाकला.
तेथे हरिष सावेकर हा कल्याण मटका जुगार चालवित होता. त्याला पथकाने पकडून त्याच्याकडील रोख रक्कम, साहित्य जप्त केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम