जिल्हाधिकारी साहेब कायदा फक्त गरीबांनाच का?

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर शहरात मा.ना.एकनाथ शिंदे साहेब नगर विकास मंत्री यांच्या दौर्‍यानिमित्त नगर शहरात जिल्हाधिकार्‍यांवर या दिवशी पक्षीय फलक लावण्यात आले.

अहमदनगर शहरात मंत्री महोदयांच्या आगमनाप्रित्यर्थ राजकिय पक्षांनी लावलेले फलक जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाची पायमल्ली करुन आदेशाचा भंग करणारे होते. या दौर्‍यातून दिसून आले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे लावण्यात आलेल्या सूचना फलकाचा अनादर होत आहे. तरी संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन शिव राष्ट्र सेना पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, भैरवनाथ खंडागळे, अनिल शेकटकर, बाबासाहेब करपे, शंभु नवसुपे, बाबासाहेब जाधव, जनार्दन कुलट, निलेश जायभाय आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी कार्याल हे शासकीय कार्यालय असून, या कार्यालयाच्या नियमानुसार या जागी कोणतेही राजकीय आंदोलने व कुठल्याही प्रकारची जाहिरात बोर्ड किंवा अमर उपोषण,

मोर्चे, धरणे या जागी करु नये अशी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सक्त मनाई करण्यात आलेली आहे. असे असतांना राजकीय पक्षाने या ठिकाणी फलक व कमानी लावल्या आहे. तरी याबाबत संबंधितांवर कारवाई व्हावी.

अन्यथा शिव राष्ट्र सेना या ठिकाणी स्वत:च्या पक्षाच्या फलक लावून आंदोलने सुरु करेल, असेही पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे यांनी निवेदनात म्हटले आहे.

पुढे असेही म्हटले आहे, एकाला एक कायदा व गरीब रयतेला दुसरा कायदा का? या फलकांवर ज्यांची नावे आहेत व ज्यांनी हा फलक लावला त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे.

सध्यातरी संबंधितांवर कारवाई होतांना दिसून येत नाही, ही गंभीर बाब असून, आम्हाला या विरोधात न्याय मिळालाच पाहिजे, असेही म्हणाले.