आ. राम शिंदे यांची नाराजी ! कर्जत-जामखेड मतदारसंघातुन विखेंच्या पराभवाची सुरवात…

डॉ. सुजय विखे यांचे कर्जत-जामखेड मतदारसंघाकडे झालेले दुर्लक्ष, तसेच आ. राम शिंदे यांची नाराजीही विखे यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे दिसते. विखे यांनी राम शिंदे यांची नाराजी अखेरच्या टण्यात दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही त्यांना मतदारसंघात पुरेसे मतदान मिळू शकले नाही.

२०१९ च्या निवडणुकीत जामखेडमधून विखेंना १८,५०० एवढे लिड मिळाले होते. मतदारसंघातील जनतेला सापत्न वागणूक दिल्याने नाराजी वाढली होती

डॉ. सुजय विखे यांचे कर्जत-जामखेड मतदारसंघाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले. जनसंपर्क नसल्याने त्यांच्याबाबत मतदारसंघात नाराजी होती. त्यात भाजपचे आ. प्रा. राम शिंदे यांची नाराजी अन् राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आ. रोहित पवार यांच्यामुळे विखे यांना तालुक्यातून यंदा मतदान झाले नाही.

आ. रोहित पवार यांनी महाराष्ट्रात फिरत असतानाच मतदार संघावरदेखील लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे लंके यांना मतदारसंघातून मताधिक्य मिळाले. राम शिंदे यांची नाराजी व मतदारसंघाकडे विखे यांनी केलेली डोळेझाक, यामुळे भाजपला फटका बसला आहे.

लंके यांच्या विजयात मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टरही प्रभावी ठरला. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समाजाबद्दल केलेले वक्तव्यही लंके यांच्या पथ्यावर पडले. तालुक्यातील मुस्लिम समाजाने लंके यांच्या पदरात भरभरून मताचे दान टाकले. शिवाय, आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे, दुष्काळात जनतेला मोफत केलेला पाणीपुरवठ्याचा फायदा झाला.

लंके यांच्या या विजयाने आ. रोहित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निवडणुकीत जामखेड शहरातील कोणत्या प्रभागात, कोणी कितीची लिड दिली, त्यावर नगरपरिषदेची उमेदवारी ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe