नागरिकांच्या प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व शहराला मिळाले आहे. संग्राम जगताप यांनी नगरसेवक पदापासून काम करायला सुरुवात केल्यामुळे त्यांना मूलभूत प्रश्न माहिती आहेत. त्यांच्यामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्याची क्षमता आहे ते थेट जनतेच्या संपर्कात राहत असल्यामुळे शहर विकासाला गती मिळाली आहे.
सर्वांना बरोबर घेऊन नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्या मध्येच असल्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला नगरकरांनी पुन्हा एकदा विधानसभेवर पाठवावे असे प्रतिपादन भाजपाचे सावेडी मंडल अध्यक्ष नितीन शेलार यांनी केले.
पाईपलाईन रोड, हनुमाननगर येथे माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून सुशोभीकरण कामाचा शुभारंभ आमदार जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी अॅड. स्वाती जाधव, शिवाजी डोके, अशोक खोकराळे, विलास भापकर,
चितामणी चौधरी, विठ्ठल कडूस, बबन वावरे, शरद मगर, रवींद्र वायकुळे, सूर्यभान मासाळ, भगवान घाडगे, मारुती सिनारे, किसन कोल्हे, अमित वाघमारे, महेश जपे, बंडू लांडगे, विजय निक्रड, अनिल वाबळे आदी उपस्थित होते.
शहरातील प्रलंबित सर्वच प्रश्नांवर काम सुरू आहे. गुलमोहर, पाईपलाईन, तपोवन रोडचे प्रश्न सोडवल्यामुळेच सावेडी उपनगराच्या विस्तारी करणाला वाव मिळाला. तारकपूर रस्त्याचे काम सुरू झाले आहे. हनुमाननगर येथे माजी खा. डॉ. विखे पाटील यांच्या निधीतून ओपन स्पेसच्या सुशोभीकरणाचे काम मार्गी लागणार आहे अशी माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली.