आ. पाचपुतेंमुळे घरकुल प्रकल्प : ना. विखे

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : आ.बबनराव पाचपुतेंच्या प्रयत्नातून वांगदरीत घरकुल प्रकल्प साकारला आहे. त्यामुळे ३५ कुटुंबांना हक्काचे घर मिळाले आहे. वांगदरी येथे उभा राहिलेला हा प्रकल्प पथदर्शी घरकुल प्रकल्प असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी करत अशाच कामांची अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली असल्याचे सांगितले.

तालुक्यातील वांगदरी येथील ३५ घरकुलांच्या पथदर्शी प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री विखेंच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. बबनराव पाचपुते होते. यावेळी बोलताना पालकमंत्री विखे म्हणाले, नुकताच सोलापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १५ हजार घरकुलांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

त्याच धर्तीवर वांगदरी येथे ३५ कुटुंबांना हक्काचे घर मिळाले असून या कामाचा दर्जाही चांगला असून आता त्यांची निगा राखण्याची जबाबदारी घरकुलधारक आणि ग्रामपंचायतीची आहे. देशभरात श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेमुळे आनंदाचे वातावरण आहे.

सर्वांनी या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होऊन आनंद द्विगुणीत करावा. त्यानिमित्ताने गावोगावी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. असल्याचे विखे यांनी सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, तालुकाध्यक्ष संदीप नागवडे,

विक्रमसिंह पाचपुते, बबनराव मदने, भगवानराव पाचपुते, सुनील दरेकर, सुवर्णा पाचपुते, महेश दरेकर, मिलिंद दरेकर, गटविकास अधिकारी राणी फराटे, राम जगताप, पी .एन. पाचनकर उपस्थित होते.

नागवडे गटाचा बहिष्कार

या कार्यक्रमावर काँग्रेसनेते राजेंद्र नागवडे गटाने बहिष्कार टाकला होता. तसे बॅनर वांगदरी परिसरात लावण्यात आले होते. पोलीस प्रशासनाने कारवाई करत सर्व बॅनर हटविले. नागवडे गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करीत कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe