आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून संगमनेरातील ८५ हजार शेतकऱ्यांना १२९ कोटींचा पीकविमा मंजूर !

Ahmednagarlive24 office
Published:
rhorat

आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून संगमनेर तालुक्यातील ८४ हजार ९३० शेतकऱ्यांना १२८ कोटी ९८ लाख रुपयांचा पिक विमा मंजूर झाला असल्याची माहिती सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

याबाबत दिलेल्या पत्रकात थोरात यांनी म्हटले की, आमदार थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील ८४ हजार ९३० शेतकऱ्यांना खरीप हंगाम पीक विम्यासाठी पाठपुरावा केला होता.

यातून प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधून २०२३ मधून अहमदनगर जिल्ह्यातून सर्वाधिक पीक विमा हा संगमनेर तालुक्याला मंजूर झाला आहे. यामध्ये मध्यम नुकसान भरपाईची आग्रीम रक्कम ३३.८६ कोटी रुपये मंजूर झाली आहे.

यामध्ये स्थानिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतीसाठी १९ लाख ६५ हजार रुपये आणि अंतिम पीक कापणी प्रयोगावरून आलेल्या उत्पन्नावर आधारित विमा रक्कम एकूण ९५ कोटी १ लाख रुपये, असे एकूण १२८ कोटी ९८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

या पीकविमा कामी उपविभागीय कृषी विकास अधिकारी गायकवाड, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, ओरिएंटल क्रोप इन्शुरन्स कंपनी, सर्व मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक याचबरोबर सोसायटी व ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले. शेतकऱ्यांना हा पीक विमा बँक खात्यावर मिळणार असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe