दिलासादायक ! जिल्ह्यातून कोरोनाची लवकरच एक्झिट होणार

अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी कमी होताना दिसून येत आहे. यामुळे नागरिकांसह प्रशासनामध्ये देखील दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.

नुकतेच अनेक तालुक्यातून रुग्णसंख्या घटताना आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. दरम्यान गेल्या 24 तासात राहाता तालुक्यात 11 करोनाबाधित रुग्ण आढळूून आले असून 16 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

तर 123 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण उपचार घेत आहेत. काल शिर्डी शहरात शून्य रुग्ण असून व राहाता शहरात केवळ दोन रुग्ण आढळून आले आहेत. राहाता तालुक्यात आतापर्यंत 25064 करोनाबाधित रुग्ण आढळून आले.

तर 24919 रुग्ण बरे होऊन घरी गेले. एकंदरीतच जिल्ह्यातून कोरोना हळूहळू हद्दपार होऊ लागला आहे. मात्र तरीही नागरिकांनी काळजी घेणं, तसेच नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.