अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात15 ऑगस्ट ते 26 जानेवारीदरम्यान विशेष कुपोषण मुक्ती अभियान राबविण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 41 हजार 236 विद्यार्थी हे कुपोषणातून बाहेर आलेले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी धडक मोहिम राबविण्यात आली. यात कुपोषीत बालकांचा शोध घेणे, तसेच दुर्धर आजार व इतर आजार असणार्या बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. जिल्ह्यात 3 लाख 37 हजार शुन्य ते सहा वर्षाची बालके असून यात 2 लाख 97 हजार 697 बालके ही सर्वसाधारण गटात आहेत.
तपासणी केलेल्या बालकांपैकी 34 हजार 557 मध्यम वजनाची बालके असून 4 हजार 697 हे तिव्र वजनाची बालके आहेत. यासह 411 बालकांना वेगवेगळे दुर्धर आजार असल्याचे केलेल्या पाहणीत समोर आले होते. सर्व बालकांचे गावानिहाय व कुपाषित श्रेणीनिहाय यादी तयार करण्यात आली.
यात बालकांचे नाव, पत्ता, अंगणवाडीचे नाव, जन्म तारिख, वय, वजन, उंची, आरोग्य समस्या, श्रेणी याच्या नोंदी घेण्यात आल्या. तसेच मार्च 2020 पासून कोविडमुळे अंगणवाड्या बंद असून बालकांना घरपोहच आहार देण्यात येत आहे. या आहारात धान्य, डाळी, तेल, मीठ आणि मिर्चीचा समावेश आहे.
जिल्ह्यात 14 तालुके असून त्या ठिकाणी 21 एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यरत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी स्वत: या अभियानात लक्ष घातल्याने हे शक्य झाले असल्याचे महिला बालकल्याण विभागाकडून सांगण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम