Ahmednagar News : तुमच्या आशीर्वादाने दोन वेळेस आमदार, कॅबिनेट मंत्री व पुन्हा आमदार म्हणून पक्षाने जबाबदारी दिली. त्या जबाबदारीचं सोनं करून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे,
तसेच गेल्या वेळेस जी तुम्ही कुणाच्यातरी सांगण्यावरून चूक केली आता पुन्हा अशी करू नका. आपला तो आपलाच हक्काचा माणूस असतो जरी चुकला तरी आपण त्याला हक्काने सांगू शकतो तसे परक्या माणसाला आपण सांगू शकत नाही.
तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा पक्षाने संधी दिल्याने मी तुमच्या विकास कामासाठी सदैव प्रयत्न करीन अशी ग्वाही आ.राम शिंदे यांनी दिले.
तालुक्यातील बावी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने आमदार राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील विविध विकास कामासाठी भरीव निधी दिल्याबद्दल त्यांचा सत्कार केला.
यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष बापुराव ढवळे, माजी संचालक पांडुरंग उबाळे, सरपंच प्रियंका पवार व उपसरपंच दादासाहेब मंडलिक, महादेव कारंडे, प्रियंका पवार, मनिषा कारंडे, सुनिता कवादे, बायमाबाई मंडलिक, युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष राम पवार, बाजार समिती माजी संचालक अॅड. कालिदास पवार, मा. सरपंच दादासाहेब पवार, लालासाहेब पवार,
शहाजी पवार, बंडू पवार, हनुमंत कवादे, हरी पवार, रवी बिरंगळ, पंडित पवार, चत्रुघन जगताप, विकास पवार, भाऊसाहेब पवार, नितीन जगताप, अशोक पवार, दगडू समुद्र, शारुख पठाण, निजाम पठाण, राजू पठाण, संभाजी कारंडे, मिलिंद जाधव, केशव मुरुमकर पवार, सुनिल चिकणे, गणेश पवार, शरद पवार,
भागवत पवार, पप्पू निकम, मानिक जाधव, सिताराम पवार, अशोक बिरंगळ, नागेश बिरंगळ, बलभीम मुरुमकर, श्रीराम शेटे, सुरेश कारंडे, अमृत कारंडे, बंडु निकम, दिपक पवार, राजु रंधवे, शत्रुगण जगताप, बाबुशा मंडलिक, शेषराव कवादे, सुनिल पवार व विशाल मंडलिक उपस्थित होते.