पंचनामे थांबवून शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने पॅकेजची घोषणा केली आहे. हे अर्थसहाय्य मिळण्यासाठी पंचनामे सुरू आहेत.

मात्र, केवळ उभ्या पिकांच्या नुकसानीचेच पंचनामे होत आहेत. त्यामुळे ही नुकसान भरपाई अत्यंत थोड्या शेतकऱ्यांना मिळेल. बहुसंख्य शेतकरी भरपाईपासून वंचित राहतील अशी स्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळेच सदोष पंचनामे त्वरित थांबवून सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मार्क्सवादी किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी मंगळवारी केली.

पत्रकारांशी बोलताना डाॅ. नवले म्हणाले, परतीच्या पावसाने भिजून खराब झालेल्या पिकांचे अधिक नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी उभ्या पिकांची तातडीने काढणी, मळणी केली. पावसाने भिजलेला,

काळवंडलेला निकृष्ट शेतमाल सावलीला नेण्याचा प्रयत्न केला जातो. परिणामी नुकसान होऊनही शेतकऱ्यांची ही पिके आज उभी दिसत नसल्याने

या नुकसानीची नोंद पंचनामे करताना केली जात नसल्याने प्रत्यक्ष नुकसान झालेले शेतकरी प्रचंड अस्वस्थ आहेत. विशेषतः सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात भरपाईपासून वंचित राहणार आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment