बायपास रोडचे काम आठ दिवसात पूर्ण करा; अन्यथा…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-अर्धवट अवस्थेतील वाळूंज शिवारातील बायपास रोडचे काम आठ दिवसाच्या आत त्वरीत मार्गी लावावे अन्यथा नगर सोलापूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बाजार समितीचे उपसभापती संतोष म्हस्के यांनी दिला आहे.

दरम्यान शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याच्या उददेशाने बाहयवळण रस्ता करण्यात आता. वाळूंज सोलापूर ते केडगांव पुणे रस्त्यापर्यंत राज्य सरकारने सुमारे 3९ किलो मिटर रस्त्यावर सुमारे तीस कोटी रुपये खर्च करुन बाहयवळण रस्त्याच्या कामास डिसेंबर २००४ मध्ये प्रशासकीय मंजूरी दिली होती.

बाहयवळण रस्त्याच्या डागडुजीसाठी कोटयावधी रुपयांचे काम एका खाजगी एजन्सीला दिलेले होते. परंतू सदर एजन्सीने वेळकाढूपणा करुन काम पुर्ण न करता वाळूंज शिवारातील एक किलोमिटरचा रस्ता अपूर्ण ठेवला आहे. त्यामुळे रोड लगत असलेल्या शेतातील पिके,

हॉटेल व्यवसायीक हे अपूर्ण कामामुळे व खराब रोडवरील वाहतूकीच्या धुळीमुळे हैरान झालेले आहेत. शेतातील शेतमाल, भाजीपाला पिके यांचे नुकसान होत आहे.

येत्या आठ दिवसांत सदर एक किमी रस्त्यांचे काम पुर्ण न झाल्यास परीसरातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने ८ फेब्रुवारी रोजी नगर सोलापूर महामार्गावर सकाळी नऊ वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यांचा इशारा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News