MP Sujay Vikhe : खा.सुजय विखेंच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नगरसेवक मैदानात ! महाविकास आघाडीतील काही नेतेही विखेंचेच काम करणार असल्याचा गौप्यस्फोट

Published on -

अहमदनगर लोकसभा मतदार संघात भाजपकडून खा. सुजय विखे यांना उमेदवारी मिळाली. महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. परंतु खा. सुजय विखे यांनी आपली राजकीय रणनीती आखण्यास सुरवात केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात पक्ष कुठलाही असला तरी त्या पक्षात विखे समर्थक असतातच असे म्हटले जाते. आता आगामी लोकसभेसाठी काँग्रेसचेच काही नगरसेवक भाजपचे उमेदवार अर्थात खा. विखे यांचे काम करणार असल्याची चर्चा आहे. हे काँग्रेसचे नगरसेवक पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांचे निष्ठावंत असल्याचे बोलले जात आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महसूलमंत्री विखे पाटील काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले होते. दरम्यान त्यांचे हे समर्थक काँग्रेसमध्येच असले तरी ते विखे यांचे जवळचे असल्याचे म्हटले जाते.

महाविकास आघाडीतील काही नेतेही विखेंच्या प्रचाराला?

ह्या बद्दल माजी नगरसेवक निखिल वारे यांनी म्हटले आहे की, आम्ही चार नगरसेवकांनी लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांच्या विजयासाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण त्यांनी विद्यमान खासदार म्हणून मतदारसंघात लक्षणीय काम केले आहे.

आम्हाला त्यांच्या विजयाची खात्री आहे असे निखिल वारे यांनी म्हटले आहेत. त्यात त्यांनी असाही दावा केला आहे की, जिल्ह्यातील इतरही महाविकास आघाडीचे नेते सुजय विखे यांचा प्रचार करतील. त्यामुळे आता आगामी कालावधीत राजकीय गणिते अधिकच अनाकलनीय होतील असे दिसते.

महाविकास आघाडीकडूनही जोरदार तयारी

अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयंत वाघ म्हणाले की, काँग्रेसचे काही पदाधिकारी भाजपच्या उमेदवाराच्या संपर्कात असल्याची माहिती पक्ष नेतृत्वाला मिळाली आहे.

तथापि, अहमदनगरमधील महाविकास आघाडी भाजपच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी पुरेशी मजबूत आहे. महाविकास आघाडी मधील पक्षातील नेते ज्या प्रकारे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत, ते पाहता सुजय विखे पाटील यांना दारुण पराभव होईल असे ते म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News