अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2021 :- जिल्हा बँकेच्या माध्यमातून काम करत असताना आगामी काळात कर्जत तालुक्यामधील राजकारणाला लागलेली किड दूर करू, अशी ग्वाही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बॅंकेचे नवनिर्वाचित तज्ञ संचालक बाळासाहेब साळुंके यांनी दिली.
कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे विविध क्षेत्रात निवड झालेल्या मान्यवरांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. साळुंके म्हणाले, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत जे घडले व ज्यांनी गद्दारी केली, ही दुर्दैवी बाब आहे.
तालुक्याला शिस्त लागली पाहिजे. राज्याचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून तालुक्यात विकासाची कामे होत आहे.
कर्जत – जामखेड भविष्यात एक विकासाचे व्हिजन असेल. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून काम करत असताना आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन प्रश्न मार्गी लावू, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बॅंकेच्या कारभारात सर्वसामान्यांवर अन्याय होत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असे ही त्यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम