राहाता तालुक्यातील 7 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन जाहीर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- राज्यात कोरोनाची आकडेवारी घटत चालली असली तरी मात्र नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने पसरू लागला आहे. यामुळे प्रशासन देखील चांगलेच धास्तावले आहे.

यामुळे आता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने आता आक्रमक पाऊले उचलली आहे. या निर्णयांची अमलबजावणी देखील जिल्ह्यात सुरु झाली आहे.

करोनाचे दहापेक्षा अधिक रुग्ण असणार्‍या राहाता तालुक्यातील अस्तगावसह 7 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या गावांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे.

दरम्यान जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी हे आदेश काढले आहेत. राहाता तालुक्यातील भगवतीपूर, पिंप्रीनिर्मळ, अस्तगाव, कोर्‍हाळे, लोणी बु., लोणी खु., कोल्हार बु. या गावांचा यात समावेश आहे. 4 आक्टोबर ते 13 ऑक्टोबर पर्यंत हे आदेश काढण्यात आले आहेत.

मात्र यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. यात दवाखाने, मेडिकल, टेस्टिंग सेंटर यांचा समावेश आहे. किराणा दुकाने, वस्तु विक्री सेवा, इ. दुकाने या कालावधीत बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सदरच्या क्षेत्रामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्तीस एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. सदर क्षेत्रातील किराणा दुकाने सकाळी 8 ते 11 यावेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

या दुकानातील किराणा दुकानदार व कामगार या दोघांनीही कोविड प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत.असे आदेशात म्हंटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe