अहमदनगर Live24 टीम, 06 नोव्हेंबर 2021 :- राहुरी येथील माजी खासदार प्रसाद तनपुरे व त्यांच्या पत्नी तथा माजी नगराध्यक्षा डॉ.उषाताई तनपुरे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.
काल दुपारी केलेल्या कोरोना चाचणीत माजी खासदार प्रसाद तनपुरे डॉ. उषाताई तनपुरे हे दोघेही करोना पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती ना.प्राजक्त प्रसाद तनपुरे यांनी दिली.
उपचारासाठी दोघांनाही दवाखान्यात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे ना. तनपुरे यांनी सांगितले. कोणीही त्यांच्या संपर्कात आले असल्यास आपली करोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम