महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत शंभरहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर ७५ रुग्णांना उपचारांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णाची संख्या आता वाढली आहे.
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर १.८१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,७६,६४,१४५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,७३,१४९ (९.३२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, आज राज्यात १४,०७७ चाचण्या झाल्या आहेत. त्यांपैकी २१७३ RT-PCR चाचणी, ११,९०६ RAT चाचणीची नोंद प्रयोगशाळेत झालेली आहे.
महाराष्ट्र राज्यात देखील काेविड-19 चे रुग्ण आढळू लागले आहेत. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात प्रशासनाने सर्दी, खाेकला या सारख्या आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना काेविड-19 ची तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. महाराष्ट्रात XBB.१.१६ ह्या व्हेरीएंटचे १९७२ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी १९ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
राज्यात बुधवारी (3 जानेवारी 2024) रोजी एकूण 862 सक्रिय रुग्ण आहेत. अहमदनगर जिल्ह्यात 5 रुग्ण आहेत तर, सर्वाधिक सक्रिय रुग्ण हे ठाण्यात आहेत. ठाण्यात 237 सक्रिय रुग्ण आहेत, मुंबईत 138 रुग्ण, पुण्यात 136 रुग्ण, छत्रपती संभाजीनगरमध्ये 62 रुग्ण, नागपुरात 61 रुग्ण, रायगडमध्ये 35 रुग्ण, साताऱ्यात 29 रुग्ण, सांगलीत 29 रुग्ण, नाशिकमध्ये 26 रुग्ण, बीडमध्ये 19 रुग्ण आहेत.