अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- गेल्या वर्षभरापासून राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यामुळे बळीराजाला शेतात पिकविलेला माल बाजारात आणण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे.
यातच मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेण्यात आले मात्र लिलाव बंदमुळे विक्रीच्या वाटा बंद झाल्या आहेत.
यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील वर्षी कोरोना स्थिती आटोक्यात आल्यानंतर घोडेगाव बाजार समितीच्या कांदा लिलावात गावरान कांदा पंधरा हजार रुपये क्विंटलपर्यंत दराने विकला होता.
मागील दोन वर्षापासून कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने यावर्षी अनेकांनी कांद्याची लागवड केली. सर्वाना उत्पादनही भरघोस मिळत आहे.
मात्र कोरोना संसर्गामुळे मार्च महिन्यापासून बाजार समितीचा लिलाव बंद असल्याने निघालेला कांदा शेतात, दारात आणि घरात ठेवण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.
भरघोस उत्पादन घेऊन माल घरातच पडून राहत असल्याने बळीराजा चिंतातुर झाला आहे. शासनाने त्वरीत लिलाव सुरु करणे आवश्यक आहे. त्यासाठीचे नियम पाळले जातील. असे आश्वासन देखील शेतकऱ्यांकडून देण्यात येत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम