अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- लायन्स क्लब ऑफ अहमदनगर प्राईडचा पदग्रहण सोहळा सामाजिक उपक्रमाने पार पडला. लायन्स प्राईडमध्ये पदाधिकारीपदी महिलांना संधी देण्यात आली असून,
गगन वधवा यांनी अध्यक्ष पदाची, रिध्दी धुप्पड यांनी सचिवपदाची तर हरमीतकौर माखीजा यांनी खजिनदारपदाची सूत्रे स्विकारली. या कार्यक्रमात बालभवन मधील दोन गरजू घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली.
नगर-मनमाड रोड येथील एका हॉटेलमध्ये लायन्सचे प्रांतपाल हेमंत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या पदग्रहण सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.
यावेळी हरजितसिंह वधवा, रिजन चेअरमन संतोष माणकेश्वर, झोन चेअरमन एकनाथ गोंदकर, सतीश राजहंस, करण धुप्पड, सरबजीतसिंग अरोरा, दिनेश फिरोदिया, मनयोगसिंग माखिजा, डॉ. राहुल धुत, डॉ. पायल धुत, रेशमा फिरोदिया, अभिजीत भळगट,
ईशा अरोरा, सनी वधवा, गुरज्योत नारंग, डॉ. दिपाली भळगट आदिंसह लायन्सचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. लायन्सचे प्रांतपाल हेमंत नाईक म्हणाले की, कोरोनाचे संकट असो की, महापुराचे लायन्सने गरजूंना नेहमीच मदतीचा हात दिला.
सामाजिक क्षेत्रात योगदान देताना लायन्सचा प्रत्येक सदस्य शेवटच्या घटका पर्यंत जाऊन त्यांना आधार देत आहे. लायन्स ही वंचितांना आधार व जगण्याची प्रेरणा देऊन सामाजिक बांधिलकी जपली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
लायन्स प्राईडच्या नुतन अध्यक्षा गगन वधवा यांनी या वर्षी भरीव सामाजिक कार्यासह वृक्षरोपण, महिला सक्षमीकरण, आरोग्य शिबीर, प्लॅस्टिक मुक्ती व कोरोनाने मयत झालेल्या कुटुंबातील गरजूंना मदत करण्याचे जाहीर केले.
परीस बालभवन मधील इयत्ता बारावीमधील गुणवंत विद्यार्थी शितल दिनकर व सिमरन तांबोली यांना व्यावसायिक शिक्षणासाठी प्रत्येकी 5 हजारची शिष्यवृत्ती देण्यात आली.
हरजितसिंह वधवा यांनी नुतन पदाधिकार्यांना सामाजिक कार्य निष्ठेने करण्याची शपथ दिली. माणकेश्वर व गोंदकर यांनी नुतन पदाधिकार्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत भळगट यांनी केले. आभार गुरज्योत नारंग यांनी मानले. कोरोना नियमांचे पालन करुन हा पदग्रहण सोहळा पार पडला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम