Ahmednagar News : राज्यासह जिल्ह्यात महिला आठ दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या पावसाने शेतात जास्तकाळ पाणी साचून राहिल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यातील सर्वात जास्त नुकसान कापसाचे झाले आहे.
पावसाच्या पाण्यात बुडालेल्या कापूस पिकावर मुळकुज्या, मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. पाथर्डी तालुक्यात एकूण ३३ हजार हेक्टरपैकी २९ हजार हेक्टरवर कपाशी लागवड असून कपाशी पीक एक दिवसात धोक्यात आले आहे.
कधी नव्हे तो यंदा जूनच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे या तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. पावसाने जोमात असलेले पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त होताना पाहून शेतकरी हतबल झाला आहे.
अतिवृष्टी झालेल्या पिकांचे पंचनामे तसेच मुळकुज्या तसेच मर रोगाने उद्ध्वस्त झालेल्या कपाशी पिकांचे पंचनामे करून एकरी ५० हजार रुपयापर्यंतचे अनुदान मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांचे कपाशी हे मुख्य पिक असून, मागील आठ दिवसांपासून या तालुक्यातील पाचही मंडळांमध्ये मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाली. अनेक शेतकऱ्यांचे कपाशी, उडीद, बाजार, मुग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजरी, मुग, उडीद काढून झाकल्याने कन्हे उगवण्यास सुरुवात झाली आहे.
त्यातच अधिकच्या पावसामुळे कपाशी पिकांवर मर व मुळकुज्या रोगाने थैमान घातले आहे. शेकडो हेक्टर कपाशी यामुळे बाधित झाली आहे. कपाशी पिकावर औषधासाठी मोठा खर्च झाला आहे. आता फक्त वेचणी बाकी असताना रोगाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निघाल्यामगत परिस्थिती निर्माण झाली आहे.
तालुक्यातील २९ हजार हेक्टर क्षेत्र बाधीत झाल्याची माहिती पाथर्डी तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
या रोगामध्ये कपाशी पिकांची मुळे कुजली जातात. मृत होतात आणि उभे असलेले झाड शेंडयाकडून सुकण्यास सुरुवात होत आहे. एकाच दिवसांत सदरचे झाड पूर्णपणे जळून जाते.