कपाशी भिजली, सोयाबीन काळवंडली…मुसळधार पावसाने शेतकरी चिंतेत

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- नेवासा तालुक्यातील पाचेगावात यंदाही पावसाने वार्षिक सरासरी ओलांडून शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान केले.

जूनपासून आतापर्यंत जवळपास 800 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरीच्या अतिरिक्त पाऊस नोंदला गेला आहे. या पावसामुळे परिसरातील सोयाबीन, कपाशी, बाजरी, मका, भुईमूग,

तूर आदी पिके व उन्हाळ कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन मागील वर्षीची पुन्हा या भागात पुनरावृत्ती झाली आहे. गेल्या वर्षी पाचेगाव परिसरात 958 मिलिमीटर पावसाची नोंद होऊन खरीप पिके वाया गेली होती.

त्या नुकसानीची शासनाकडून अजूनही भरपाई मिळालेली नाही. त्यात यंदा पुन्हा पावसाने तडाखा दिला असून शेतकरी पुर्णतः कोलमडला असल्याचे दिसत आहे.

मागील ऑक्टोबर महिन्यात शासनाने शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन नुकसान पिकाचे पंचनामे करण्यात आली होती, त्या नुकसान पंचनामेचे पैसे

आजून शेतकर्‍यांना मिळाले नाही. तोच पुन्हा एकदा शेतकर्‍यांना वर अतिवृष्टी होऊन घात केल्याचे चित्र या भागात स्पष्ट दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News