अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- पाटपाण्याच्या वादातून खून करणाऱ्या दोघा बंधूंना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलीआहे. चित्तरंजन रामचंद्र घुमरे व प्रियरंजन रामचंद्र घुमरे (दोघे रा. भातकुडगाव, ता.शेवगाव) असे शिक्षा झालेल्या दोघांची नावे आहेत.
जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी हा निकाल दिला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे ज्ञानेश्वर नागरगोजे हे आई-वडिलांसमवेत राहत होता.
त्याचा व्यवसाय शेती होता. शेती कामाला मदत म्हणून त्याचा नातेवाईक वैभव हरिभाऊ सानप (रा. सौताडा, ता.पाटोदा, जि. बीड) भातकुडगावला आला होता.
५ मार्च २०२० रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास ज्ञानेश्वर नागरगोजे व वैभव सानप हे दोघे शेतीला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. ज्ञानेश्वर यांच्या शेताशेजारी असलेल्या चित्तरंजन रामचंद्र घुमरे व प्रियरंजन रामचंद्र घुमरे यांच्या शेताच्या पाण्यासाठी छोट्या-छोट्या चाऱ्या बनविलेल्या होत्या.
ज्ञानेश्वर हा पाटाच्या कडेला बसला होता. दोन्ही आरोपी मोटारसायकलवर आले. तुम्ही आमच्या शेताजवळील चारीच्या पत्र्याचे गेट का काढले? असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण केली.
त्यानंतर चित्तरंजन घुमरे याने ज्ञानेश्वर यांच्या छातीवर लाथा मारल्या. या घटनेमुळे ज्ञानेश्वर हा १० फूट उंचीवरुन खाली पडला. तो गंभीररित्या जखमी झाला.
त्यास पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र ११ डिसेंबर २०२० रोजी ज्ञानेश्वर नागरगोजे याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम