तडका आणि फोडणी महाग ; लसणापाठोपाठ शेवगा १२० किलो तर कोथिंबीर ४० रुपयांना जुडी

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : पावसाळ्यात अनेकांना चमचमीत, लज्जतदार, झणझणीत खाण्याची हौस असते. मात्र याला लसणाची खमंग फोडणी दिल्याशिवाय पर्याय नसतो. परंतु हाच लसूण आता २५० पार झाल्याने गृहिणींच्या किचनचे बजेट साफ कोलमडले आहे.

मध्यंतरी कांदे आणि यानंतर टोमॅटो, कोथिंबीर यांचे भाव आभाळाला भिडले होते त्यातून जरा कठे सुटका होईल असं वाटत असतानाच लसणाचे भाव पुन्हा कडाडले. लसूण हा अत्यंत गुणकारी तसेच जेवणाची लज्जत वाढविणारा असून त्याशिवाय जेवण अपूर्ण असते. मात्र सध्या याच लसणाने सर्वांच्या तोंडचे पाणीच पळवले आहे. त्यापाठोपाठ हिरवी मिरची १०० – १२० रुपये किलो, शेवगा १२०, कोथिंबीर ४० रुपयांना जुडी मिळत आहे.

मागच्या वर्षी मान्सूनच्या काळात चांगला पाऊस झाला नाही. लसणाचे पीक कमी झाले. तर, दुसरीकडे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस आल्यामुळे काही ठिकाणांवरील लसणाचे पीक उदध्वस्त झाले. परिणामी लसणाच्या उत्पन्नत मोठ्या प्रमाणात घट झाली. तसेच महाराष्ट्रात त्यातुलनेत लसणाचे उत्पादन कमी प्रमाणात होते. लसणाची आवक कमी असल्याने भाव वाढले.

जिल्ह्यात मागच्या आठ दिवसांपासून पाऊस सुरु झाला आहे. काही जिल्ह्यात मध्यम व हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे. काही भागात अजिबात पाऊस न झाल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत आहे. यंदा पाऊस लांबल्यामुळे गरिबाला परवडेल अशे भाज्यांचे दर नाहीत. भाज्यांचे भाव कडाडले आहेत.

उन्हाळ्यामुळे लावलेले रोप जळून गेल्यामुळे मागणी जास्त पुरवठा कमी असे झाले आहे. घेवडा १२० ते २००, गवार ८० ते १२०, शेवगा ५०ते १००, फ्लॉवर ८० रुपये प्रति किलो आणि कोथिंबीर ५० रुपये जुडीने विकल्या जात आहेत.

बाजारात कोबी, भेंडी, दोडकी आणि वांग्याचा दर १०० रुपये प्रति किलो झाला आहे. काही दिवसांनंतर भाजीपाला आणखी महाग होणार आहे. दरवर्षी साधारणपणे पाऊस येऊन गेल्यामुळे या काळात भाजीपाला स्वस्त असतो.

परंतु यंदा उन्हाचा कडाका जास्त असल्याने रोप जळून गेली. आवक कमी झाल्याने बटाटे, कांदे आणि टोमॅटो वगळता सर्वच भाज्यांचे दर २५ ते ३० टक्‌यांनी वाढले आहेत. यामुळे आता महिलांचे बजेट कोलमडले आहे. आठ दिवसापासून पावसाने सर्वत्र दमदार एंट्री घेतली आहे.

यामुळे शेतातील मालाचे नुकसान झाले. समितीत मालाची आवक कमी झाली. पुरवठा कमी आणि मागणी वाढल्याने भाजीपाल्याच्या किमती वाढल्या आहेत.

सोमवारी नगर बाजार समितीत मिळालेले दर : टोमॅटो ६०० – ५०००, वांगी १००० – ४५००, फ्लावर १००० – ८०००, कोबी ७०० – २५००, काकडी ७०० – २८००,
गवार ६००० – १०,०००, घोसाळे १००० – ५०००, दोडका ३००० – ७५००, कारले ३००० – ८०००, भेंडी १५०० – ६०००, घेवडा १०,००० – १४,०००, बटाटे २००० – ३०००, लसूण ६००० – १८,०००, हिरवी मिरची ३५०० – ८०००, शेवगा ८००० -१२०००, भु. शेंग ३००० – ४५०००, लिंबू १००० – ५०००, गाजर १८०० – २६००, दू. भोपळा ५०० – २०००, शि. मिरची २००० – ५५००, मेथी ३००० – ६४००, कोथंबीर ४५०० – १२०००, पालक ३००० – ४०००, शेपू भाजी ४००० – ६४००, चवळी ४००० – ६०००, बीट २००० – २५००.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe