अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- अविचाराने व हयगयीने ढंपर चालवून एसटी बसचे नुकसान करणाऱ्या ढंपर चालकांविरुद्ध राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
नगर-मनमाड राज्य महामार्गावरील गणेगाव फाट्याजवळ शुक्रवारी सायंकाळी अपघाताची ही घटना घडली. एमएच १७ बीवाय ५६५७ क्रमांकाचा ढंपर-गणेगाव फाट्यावरून नगर-मनमाड राज्य महामार्गावर येत असताना एमएच १४ बीटी ०७०१ क्रमांकाच्या एसटी बसला धडकला.

या घटनेत बसचे नुकसान झाले. घटनेनंतर ढंपर चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. बसचालक विजय बोडखे, रा. सटाणा, ता. मालेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी ढंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस काॅन्स्टेबल ज्ञानदेव गर्जे करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम