अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- आर्थिक दुर्बल घटकांचा समावेश असलेल्या लाल कार्डधारक विडी कामगारांना दिवाळीच्या तोंडावर रोजंदारी बंद केल्याच्या निषेधार्थ शहरातील विडी कारखान्याच्या शाखेसमोर निदर्शने करण्यात आली.
लालबावटा विडी कामगार युनियनच्या आयटक व इंटकच्या नेतृत्वात आंदोलन झाले. दिवाळीच्या तोंडावर एका नोटीसद्वारे लालकार्ड धारक विडी कामगारांना कार्यमुक्त केल्याने त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनला आहे.
यामुळे संतप्त विडी कामगारांनी विडी कारखान्याविरोधात रस्त्यावर बसून जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान पुण्यातील ठाकूर सावदेकर आणि कंपनी लिमिटेडची शहरातील बागडपट्टी येथे शाखा कार्यरत आहे.
या शाखेत 19 ऑक्टोंबर रोजी एक नोटीस लावून लाल कार्डधारक विडी कामगारांची कामे 25 ऑक्टोबरपासून बंद करण्यात आले.
लाल कार्डधारकमध्ये ज्येष्ठ महिला, सेवानिवृत्त विडी कामगार व इतर गोरगरीब विडी कामगार काम करत आहेत. यामध्ये 80 टक्के निवृत्त गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला आहेत.
यामुळे यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर आला आहे. याप्रकरणी संघटनाने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले. तसेच कोणतेही कागदपत्रे, पुरावे न देता थातूरमातूर कारणास्तव लालकार्ड बंद करण्यात आले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम