अवकाळी पावसाने अहमदनगर जिल्ह्यात २१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान ! पहा तुमच्या तालुक्यातील नुकसानीची आकडेवारी

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात रविवारी (दि.२६) अवकाळी पाऊस झाला. या पावसाने व गारपिटीमुळे जिल्हाभरात २०८ गवे प्रभावित झाली. संपूर्ण जिल्ह्यातील तब्बल २१ हजार ७८७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

सध्या हा प्राथमिक अंदाज असून वास्तव आकडेवारी कमी अधिक होऊ शकते. हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

* तालुकानिहाय स्थिती

संगमनेर तालुक्यातील १३ गावांतील २१५ शेतकऱ्यांच्या १३३ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष व कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. श्रीगोंदे तालुक्यातील ५ गावांमधील २२ शेतकऱ्यांच्या १८ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षाचे नुकसान झाले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील २७ गावातील ४५७ शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

राहाता तालुक्यातील ७ गावातील ९९ शेतकऱ्यांच्या ६२ क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. जामखेड तालुक्यातील ४० गावामधील १३ हजार १२५ शेतकऱ्यांच्या ८०० हेक्टर क्षेत्रावरील ज्वारी, कांदा मका, सोयाबीन, आंबा, द्राक्ष या पिकाचे नुकसान झाले आहे.

अकोले, पारनेरमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. अकोले तालुक्यातील ६० गावातील २ हजार ९१० शेतकऱ्यांच्या ९२७ हेक्टर क्षेत्रावरील भात व कांदा या पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

पारनेर तालुक्यात ४६ गावांमधील १७ हजार ८७३ शेतकऱ्यांच्या १२ हजार ६६३ हेक्टर क्षेत्रावरील कांदा, केळी, पेरू, मका, द्राक्ष, टमाटर डाळिंब, बोर, पपई या पिकांचे नुकसान झाले आहे.

*तातडीची मदतीची अपेक्षा

शेतकऱ्यांना या नुकसानीची आर्थिक दृष्ट्या कोलमडून टाकले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने २५ हजारांची मदत द्या, बाकी मदत पंचनामा झाल्यावर द्या अशी मागणी सध्या काही लोकप्रतिनिधी करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe