नगर जिल्ह्यासाठी कोट्यवधींचा निधी; शासनाने जारी केले पत्र

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत शासनाने दिलेल्या मंजुरीनुसार आणि जिल्ह्यांकडून प्राप्त झालेल्या मागणीनुसार ४७० कोटी ९० लाख २४ हजार रुपयांचा निधी राज्यातील सर्व जिल्ह्याधिकार्‍यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

यात नगर जिल्ह्यासाठी १७ कोटी २ लाख ६७ हजार रुपयांचा समावेश आहे. याबाबतचे परिपत्रक नियोजन विभागाने जारी केले आहे.

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमासाठी २०१९-२० या आर्थिक वर्षात सर्व जिल्हाधिकार्‍यांना निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.

त्यापैकी ३१ मार्च २०२० अखेर झालेला खर्च वजा जाता जिल्ह्यांनी शासनास समर्पित केलेल्या निधीपैकी जिल्ह्यांनी मागणी केल्यानुसार ४७६ कोटी ८७ लाख २१ हजार रुपयांचा निधी २०२०-२१ मध्ये पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी विधानमंडळाच्या डिसेंबर २०२० च्या हिवाळी अधिवेशनात पूरक मागणी मंजूर करण्यात आली आहे.

हा निधी बीम्स संगणक प्रणालीद्वारे वितरीत करण्यात आला आहे. हा निधी ३१ मार्च २०२१ पूर्वी खर्च करण्यात यावा असे निर्देशही देण्यात आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment