जिल्ह्यातील ‘या’देवी गडावर जमावबंदी..! केवळ ऑनलाईनपास असलेल्या भाविकांना दर्शन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :-  सध्या राज्यातील विविध ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे. दर्शनासाठी देवी भक्तांची मोठी गर्दी होत आहे.

या पार्श्वभूमीवर पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटादेवी गड येथील शारदीय नवरात्र महोत्सव यात्रेस जिल्हा प्रशासनाने कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घातलेले असून,

सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच मंदिर परिसरात दि.२०ऑक्टोबर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेले आहेत.

सर्व रस्ते सुमारे चार किलोमीटर अंतरावरच पोलिस प्रशासनाने बंद केलेले असून केवळ ऑनलाईन दर्शन पास असलेल्या भाविकांनी दर्शनासाठी यावे असे आवाहन देवस्थानचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी केले आहे .

दर्शन पास असलेल्या भाविकांनी कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे , सुरक्षित अंतर ठेवावे, योग्य पद्धतीने मास्क लावावा,

हाताची स्वच्छता ठेवावी तसेच इतरांनी अनावश्यक गर्दी टाळावी असे ही प्रसिद्धी पत्रकात नमूद केलेले असून भाविक भक्तांनी देवस्थान समितीस सहकार्य करावे.

महसूल यंत्रणा व पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe