मनोहर भोसले बद्दल आताची ब्रेकिंग बातमी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- महिलेवर अत्याचाराच्या आरोपात अटकेत असलेल्या मनोहर भोसले याला बार्शी येथील जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारी सशर्त जामीन मंजूर केला आहे.

पंचवीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यासह इतर अटींच्या अधीन हा जामीन मंजूर केल्याचे भोसले यांचे वकील रोहित गायकवाड (श्रीगोंदा) यांनी सांगितले.

सप्टेंबर २०२१ पासून अटकेत असलेले मनोहर भोसले याच्यावर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. पहिला गुन्हा बारामती येथे जादूटोणा व आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दाखल होता.

दुसरा गुन्हा करमाळा पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. त्यात साताऱ्यातील महिलेवर अत्याचार केल्याचा ठपका भोसलेवर होता.

पहिल्या गुन्ह्यात अटकेत असताना न्यायालयीन कोठडी मिळाली तेव्हाच करमाळा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तपास सुरू केला होता. तेव्हापासून तो अटकेतच आहे.

सध्या मनोहर भोसले हा अकलूज येथील एका खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. गेल्या महिन्यात त्याच्यावर एक शस्त्रक्रिया झाली आहे.

काही दिवसांपूर्वी करमाळा पोलिसांच्या वतीने भोसले प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे होते. या प्रकरणात प्रकरणात संबंधित महिलेच्या जिल्ह्यात मनोहर भोसले याला जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

साक्षीदारांना भोसलेंकडून त्रास होता कामा नये, अशा अटी व २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

शिवाय तो राहत असलेला पत्ता बदलण्यापूर्वी परवानगी घेणे गरजेचे आहे, अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत. त्यामुळे आता तो तुरुंगातून बाहेर पडणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe