अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. अपघाताच्या वाढत्या सत्रामुळे दरदिवशी अनेक निरपराध नागरिकांचा बळी जात आहे.
तर काही जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नुकतेच संगमनेर तालुक्यातून जाणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा शिवारात येथे कारच्या धडकेत सायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, माळवाडी शिवारातील कुर्हाडे वस्ती येथील वैष्णव संदीप कुर्हाडे हा तरूण बुधवारी सकाळी दूध घालण्यासाठी सायकलवरून डेअरीवर येत होता.
त्याच दरम्यान वैष्णव हा महामार्ग ओलांडत असताना पुण्याकडून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगाने जाणार्या कारने सायकलला जोराची धडक दिली.
या अपघातात वैष्णवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे तर कारमधील दोघे किरकोळ जखमी आहेत. अपघातानंतर नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना उपचारार्थ आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात हलविले.
मात्र, वैष्णवला अधिक उपचारांसाठी पुणे येथे नेण्यात आले आहे. अपघाताची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved