अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- कैलासवासी माजी खासदार दादा पाटील शेळके यांनी अनेक संस्था उभ्या केल्या आणि नावारूपाला आणल्या. पण दादा पाटील शेळके यांचे नाव असणाऱ्या बाजार समितीला भ्रष्ट कारभारामुळे शासनाची नोटीस मिळाली.
त्यात सुरू असणारे गैरव्यवहार पाहून कै. दादा पाटील शेळकेंना खरंच दुःख होत असेल, अशी खंत व्यक्त करणाऱ्या भावना जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी व्यक्त केल्या.
बाजार समितीसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, सहकारी संस्था यांना फक्त जागा विकण्यासाठी हव्या आहेत. दूध संघाची जागा विकली आणि आता बाजार समितीची जागाही विकली जाईल. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ,
शरद झोडगे, काँग्रेस तालुकाध्यक्ष संपत म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ, उपसभापती डॉ. दिलीप पवार, संदीप गुंड, रामदास भोर, प्रवीण कोकाटे, प्रवीण गोरे, गुलाब शिंदे, रवींद्र भापकर आदी उपस्थित होते.
मागील काही दिवसांपूर्वी बाजार समिती पदाधिकारी यांनी संदेश कार्ले आणि बाळासाहेब हराळ यांच्यावर विश्वासहर्ता गमावल्याचा आणि प्रा. गाडे यांना फसविल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना कार्ले म्हणाले, आम्ही प्रा. गाडे यांचा आदेश कधीही डावलला नाही.
मागील सरकारच्या काळात सूर्यवंशी अहवाल आला होता, तो भाजपा सरकारने दाबला होता. शिवसेनेत हुकूमशाही नाही, जिल्हाप्रमुख कोण करायचा ते पक्ष ठरवील. बाजार समिती प्रकरण वाढवू नका.
आमचा बळी जाईल असे यांचेच संचालक सांगतात. बाजार समितीचे माजी सभापती बाबासाहेब गुंजाळ म्हणाले, आमच्या काळात कर्मचारी पगार एक तारखेला होत. भविष्य निर्वाह निधी नियमित भरला जाई. कर्मचारी पदोन्नती नियमाने दिली जाई, पण आता नियम डावलून पदोन्नती दिली जात आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम