अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- शेतातील पाचरट पेटवून दिले. ती आग पसरत जाऊन पुंजाहरी मुंगसे यांच्या उसाच्या शेताला लागली. यावेळी मुंगसे यांचा दिड एकर ऊस जळून खाक झालाय. त्यामुळे त्यांचे लाखों रूपयांचे नूकसान झाले आहे.
ही घटना ६ डिसेंबर रोजी घडली. याबाबत राहुरी पोलिसांत धोंडीराम बोंबले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राहुरी तालूक्यातील माहेगाव येथे पुंजाहरी मुंगसे यांचे शेत गट नं. २४२ येथे ऊसाने क्षेत्र आहे.
त्यांच्या शेजारी आरोपी धोंडीराम बोंबले याचे शेत आहे. दिनांक ६ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजे दरम्यान धोंडीराम बोंबले यांनी त्यांच्या शेतातील पाचरट निष्काळजी पणाने पेटवून दिले.
ती आग पसरत जाऊन पुंजाहरी मुंगसे यांच्या ऊसा पर्यंत पोहचली. या घटनेत पुंजाहरी मुंगसे यांचा दिड एकर ऊस जळून खाक झालाय. त्यामध्ये त्यांचे लाखों रूपयांचे नूकसान झाले आहे.
असे पुंजाहरी मुंगसे यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुंजाहरी मारूती मुंगसे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी धोंडीराम तुकाराम बोंबले राहणार
माहेगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अमित राठोड हे करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम