युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखापासून धोका; ‘यांची’ एसपींकडे तक्रार

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News:- युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांनी दमबाजी करत लग्न होऊ न देण्याची तसेच पक्षाचे काम न केल्यास तुझा काटा काढू, अशी धमकी दिली असल्याची तक्रार हिंदुराष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्ये गजेंद्र सैंदर यांनी केली आहे. त्यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. सैंदर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेत याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

गजेंद्र सैंदर हे गेल्या काही वर्षांंपासून हिंदुराष्ट्र सेनेचे काम करत आहेत. यादरम्यान त्यांची युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर राठोड यांनी सैंदर यांना शिवसेना पक्षात प्रवेश करत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास सांगितले. त्यास सैंदर यांनी नकार दिला असता राठोड यांनी तुम्ही कसे काम करता, मी पाहून घेतो असे म्हणत धमकी दिली होती.

त्यानंतर 10 एप्रिल रोजी श्रीरामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान विक्रम राठोड यांना कोयता दाखवून सैंदर यांनी धमकी दिल्याप्रकरणी सैंदर यांच्याविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा गुन्हा राजकिय दबावातून दाखल झाला असल्याचे सैंदर यांनी सांगितले. तसेच या गुन्ह्यात न्यायालयाने सैंदर यांना जामीन मंजूर केला असल्याने तुला जामीन तर मिळाला पण आता तुझे लग्न कसे होते ते मी पाहतो, अशी धमकी राठोड यांनी दिली आहे. तसेच लग्नाआधी आणखी गुन्हे दाखल करणार असल्याचे राठोड यांनी सैंदर यांना म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe