Ahmednagar News : अहमदनगरकांच्या जीवाला धोका.. गुन्हेगारी, आजारांपासून नव्हे तर सर्पदंश, श्वानंदशापासून ! ४४६ सर्पदंश तर २१ हजार जणांना कुत्र्याचा चावा

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कधी पाऊस कमी तर कधी इतर नैसर्गिक संकटे. परंतु जर तुम्हाला म्हटलं की अहमदनगरकांच्या जीवाला धोका आहे. तेही गुन्हेगारी, आजारांपासून नव्हे तर सर्पदंश, श्वानंदशापासून !

ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल. पण अहमदनगर जिल्ह्यात यंदाच्या वर्षात निष्काळजीपणामुळे ग्रामीण भागात सर्पदंशाच्या ४४६ घटना तर २१ हजार २८२ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्यात.

शहरी भागात नगरपरिषदा तसेच ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर मोकाट जनावरांसह भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय योजना राबवणे अपेक्षीत आहे. तथापि, उदासीन प्रशासनाकडून ठोस पावले न
उचलल्याचा फटका नागरिकांना बसला आहे.

यंदा श्वानदंशाचे प्रमाण २१ हजार २८२ वर तर सर्पदंशाच्या घटनात किरकोळ वाढ होऊन आकडा ४४६ वर पोहोचला. अकोले, कोपरगाव, राहाता, संगमनेर व श्रीरामपूरमध्ये सर्पदंशाचे प्रमाण अधिक दिसून येत आहे.

जिल्ह्यात कुठे किती घडल्या सर्पदंशाच्या घटना

नगर ११, अकोले ५२, जामखेड ७, कर्जत २७, कोपरगाव ७१, नेवासे ३१, पारनेर १२, राहुरी २४, संगमनेर ६९, श्रीगोंदे २७, श्रीरामपूर तालुक्यात ६० संर्पदंश घटना घडल्या असल्याने माहिती मिळाली आहे.

जिल्ह्यात कुठे किती घडल्या श्वानदंशाच्या घटना

नगर १९४४, अकोले ८२६, जामखेड ८३५, कर्जत १३५७, कोपरगाव १३५९, नेवासे २७८८, पारनेर १५०८, पाथर्डी १५४३, शेवगाव १०२८, राहता ७६६, राहुरी २०१८, संगमनेर २३१, श्रीगोंदे १९६६, तर श्रीरामपूर १४९६

सर्पदंश पासून बचाव कसा करावा ?

घरपरिसर स्वच्छ ठेवावा व काम करताना अधिक सतर्क राहिले पाहिजे.
शेतात काम करताना हॅण्डग्लोक व बुटांचा वापर करावा म्हणजे धोका टाळता येईल.
सुरक्षा हाच यापासून वाचण्याचा चांगला पर्याय आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe