Ahilyanagr News : पत्नीसह मुलींना जाळून मारले, अनैतिक संबंधाच्या संशयातून हत्याकांड

Ahmednagarlive24 office
Published:
Ahilyanagr News

Ahilyanagr News : नगर तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पतीने आईसह दोन मुलींना जाळून टाकून त्यांची हत्या केल्याची घटना घडली. ही घटना आज सकाळी (२५ मार्च) नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे घडली. सुनील लांडगे असे आरोपी नाव आहे.

अधिक माहिती अशी : अनैतिक संबंधाच्या संशयातून ही घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी सुनील लांडगे यास आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यातून त्यांचे नेहमीच वाद होत असत. आज सकाळी (२५ मार्च) आरोपी व पत्नीत पुन्हा वाद झाला. त्याने पत्नीसह मुलींच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. यात तिघींचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे.

लीलाबाई सुनील लांडगे (आई), साक्षी व ख़ुशी (मुली) अशी मृतांची नावे असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती समजताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव भेटली. त्याठिकाणी पंचनामा करत कार्यवाही सुरु केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून तिघींच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली होती. अधिक तपास पोलीस करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe