दौंड-अहमदनगर-कोपरगाव रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडावा, नगर-पुणे साठी या रेल्वेची तपासणी करण्याचे राज्य रेल्वेमंत्रीच्या सूचना

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : दौंड-अहमदनगर-कोपरगाव रेल्वे स्थानक सोलापूर विभागाला ऐवजी पुणे विभागाला जोडण्याची व नगर-पुणे शटल रेल्वे सेवा सुरु होण्याबाबत राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी हरजितसिंह वधवा, संजय सपकाळ, प्रशांत मुनोत, भाजपचे भानुदास बेरड, सचिन पारखी, अभय आगरकर, वसंत लोढा, अर्शद शेख, संदेश रपारिया, अशोक कानडे, सुनिल छाजेड, सुहास मुळे, मुबीन मुल्ला आदी उपस्थित होते.

राज्य रेल्वेमंत्री दानवे गुरुवारी (दि.17 ऑक्टोबर) शहरात आले असता, जिल्हा प्रवासी संघटनेच्या शिष्टमंडळाने त्यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन या विषयावर चर्चा केली.

सदर प्रश्‍नावर सकारात्मक चर्चा करुन दानवे यांनी नगर-पुणे रेल्वेसाठी नुकतीच सुरु झालेली आष्टी-नगर रेल्वे ही पुण्यापर्यंत कशी नेता येईल? या संदर्भात तपासणी करण्यास रेल्वेचे अधिकारी देशपांडे यांना सूचना केल्या.

भाजपच्या पदाधिकार्‍यांनी राज्य रेल्वेमंत्री यांची प्रवासी संघटनेच्या शिष्टमंडळाची ही भेट घडवून आणली. दौंड ते अहमदनगर ते कोपरगाव हे रेल्वे स्थानक दळणवळणाच्या दृष्टिकोनातून पुणे शहराजवळ आहे.

त्याचप्रमाणे सर्व तालुके पुणे शहराला जोडले गेलेले आहेत. सोलापूर पेक्षा पुणे येथील रेल्वेच्या अधिकार्‍यांना ही रेल्वे स्थानक सोयीचे ठरणार आहे. पुण्याला जायला 3 तास, तर सोलापूरला जाण्याकरिता 6 ते 8 तास लागतात.

प्रवासी यांना देखील अपंग कार्ड किंवा पूर्ण बुगी बुकिंग करिता सोलापूरला जाणे अडचणीचे होत असते. अनेक वेळेस प्रवासी बुकिंग करण्यास टाळतात. त्यामुळे रेल्वेचे मोठे नुकसान होत आहे.

पुणे येथील विभागीय अधिकारी यांना देखील दौंड ते कोपरगाव हे स्थानक वेळोवेळी पहाणी करुन येणार्‍या अडचणी सोडविण्याचे सोयीचे होणार असून, यामुळे रेल्वेचा देखील फायदा होणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe