Ahmednagar News:कोपरगाव शहरातील मध्यवर्ती भागात बैलबाजार जवळ असलेल्या नाल्यात संजय छबुराव कोपरे (वय ४०) यांचा मृतदेह आढल्याने एकच खळबळ उडाली.
यावेळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. कोपरगाव शहरातील बैल बाजार नजीक असलेल्या नाल्यात सोमवारी सकाळी एका ४० इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.
सदरच्या इसमाचे नाव संजय छबू कोपरे असल्याचे समजते. तो शहरातील टाकळी नाका येथील रहिवासी असून तो गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता.
सर्वत्र शोध घेतल्यावर सापडत नसल्याने अखेर त्यांच्या कुटुंबियांनी शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, मृतदेहाबाबत माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करत सदर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
इसमाचा मृत्यू कसा झाला हे अद्याप समजू शकले नाही. याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस करत आहे.