अहमदनगर ब्रेकिंग : तलावात आढळला जवानाचा मृतदेह

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेला जवान सुट्टीसाठी बेलकरवाडी ( ताहाराबाद, ता. राहुरी) येथे गावी आला होता. संबंधित जवानाचा मृतदेह गावातील एका तलावात काल सोमवारी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर बाबासाहेब ढवळे (वय २३) असे मृत जवानाचे नाव आहे. संबंधित जवानाचा मृतदेह गावातील एका तलावात आढळल्यानंतर त्यास राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी आणले होते.

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तोडमल यांनी तपासणीला येण्यापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. राहुरी पोलीस ठाण्यामध्ये संबंधित सैन्य दलातील जवान ज्ञानेश्वर ढवळे याच्या मृत्युप्रकरणी अकस्मात नोंद करण्यात आली आहे. घटनेबाबतचा अद्याप नेमका खुलासा झालेला नाही.

पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस हवालदार नागरगोजे हे पुढील तपास करीत आहे. घटनास्थळ पाहणी व सविस्तर चौकशी केल्यानंतरच घटनेचा उलगडा समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe