Ahmednagar Crime : शिंगणापूरच्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला ! लोखंडी गजाने डोक्यात…

Published on -

Ahmednagar Crime : श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे रविवारी सायंकाळी भाविकांना अडथळा होईल, अशी लावलेली गाडी काढण्यास सांगितल्याचा राग आल्याने एका व्यक्तीने देवस्थानचा सुरक्षारक्षक संदीप आप्पासाहेब दरंदले यास लोखंडी गजाने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना घडली आहे.

जखमी दरंदले यांना नगर येथील रुग्णालयात नेले असल्याची माहिती समजली. याबाबत स्थानिक सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, शनि दर्शनासाठी येत असलेल्या भाविकांना अडथळा निर्माण करत चारचाकी वाहन उभे केले होते.

हे वाहन बाजूला घेण्यासाठी शनैश्वर देवस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी सांगितले. त्याचा राग आल्याने त्या युवकाने सुरक्षा रक्षकाला दमदाटी केली व लोखंडी गजाने मारहाण केली.

या मारहाणीत दरंदले यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली आहे. अहमदनगर येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती समजली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe